सन १९४८ ते १९४९ मध्ये स्वामी शामानंद महाराज पुण्य अशा गोकर्णभूमीतून मुंबईमधील घाटकोपर उपनगरातील भटवाडी येथे आले. अध्यात्मातून ज्ञानाचा दीप लोकांमध्ये प्रज्वलित करणे या जाणीवेतून स्वामींनी १९५४ मध्ये मतमहाकाली मंदिरात बालवाडी सुरू केली आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या भटवाडी विभागातील मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण झाली. आपल्या परिसरातील मुलांनी ज्ञांनानी मोठे व्हावे, समृद्ध व्हावे त्याठी शाळा सुरू करावी ही एकच गोष्ट स्वामींच्या मनात आली, आणि मग स्वामींनी आपली मनोकामना निष्टावंत भक्त स्व. पि. के. शिंदे व श्री. प.म.राऊत सरांकडे व्यक्त केली.सरांनी स्वामींच्या इछ्येला स्वीकृती दिली. स्वामींची ही संकल्पना त्यावेळेचे आमदार स्व. श्री. दत्ता सामंत, स्व. श्री. पि. के. शिंदे व श्री. शरद चिटणीस यांच्या प्रेरणेतून पूर्णत्वास आली आणि सन १९८७ साली स्वामी शामानंद हायस्कूलची स्थापना झाली. अशा रितीने शिशुवर्ग ते १२ वी पर्यंतचे शिक्षणाचे दरवाजे भटवाडी बर्वेनगर परिसरातील शेकडो अल्पउत्पन्न गटातील पालकांसाठी खुले झाले .
© 2016 - All Rights belongs to Swami Shamanand Education Society