स्वामी शामानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज

बर्वेनगर म्युन्सिपल इंग्लिश प्राथमिक शाळा, भटवाडी, घाटकोपर (प.), मुंबई – ४०० ०८४
Announcement

स्वामी शामानंद हायस्कूल मध्ये आपले स्वागत आहे

सन १९४८ ते १९४९ मध्ये स्वामी शामानंद महाराज पुण्य अशा गोकर्णभूमीतून मुंबईमधील घाटकोपर उपनगरातील भटवाडी येथे आले. अध्यात्मातून ज्ञानाचा दीप लोकांमध्ये प्रज्वलित करणे या जाणीवेतून स्वामींनी १९५४ मध्ये मतमहाकाली मंदिरात बालवाडी सुरू केली आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या भटवाडी विभागातील मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण झाली. आपल्या परिसरातील मुलांनी ज्ञांनानी मोठे व्हावे, समृद्ध व्हावे त्याठी शाळा सुरू करावी ही एकच गोष्ट स्वामींच्या मनात आली, आणि मग स्वामींनी आपली मनोकामना निष्टावंत भक्त स्व. पि. के. शिंदे व श्री. प.म.राऊत सरांकडे व्यक्त केली.सरांनी स्वामींच्या इछ्येला स्वीकृती दिली. स्वामींची ही संकल्पना त्यावेळेचे आमदार स्व. श्री. दत्ता सामंत, स्व. श्री. पि. के. शिंदे व श्री. शरद चिटणीस यांच्या प्रेरणेतून पूर्णत्वास आली आणि सन १९८७ साली स्वामी शामानंद हायस्कूलची स्थापना झाली. अशा रितीने शिशुवर्ग ते १२ वी पर्यंतचे शिक्षणाचे दरवाजे भटवाडी बर्वेनगर परिसरातील शेकडो अल्पउत्पन्न गटातील पालकांसाठी खुले झाले .

आमचे जीवितकार्य (Mission)

  • शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव विकसित करणे.

आमची दूरदृष्टी (Vision)

  • ज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे बहुजन व वंचित समाजातील विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठीत शिक्षण देणारी ज्ञानप्रवर्तक संस्था बनणे.

आमची उद्धिष्टे (Goals)

  • विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांची वर्तणूक आणि चारित्र्य यांमधून प्रतिबिंबित होईल असे ज्ञान देऊन त्यांच्यात जीवनातील आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण करणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये भावप्रज्ञा, संघभावना, नेतृत्वगुण, राष्ट्रीय एकात्मता विकसित करून सर्जनशीलता आणि विश्लेषणात्मक कौशल्य यांचे एकत्रीकरण असलेले शैक्षणिक कार्यक्रम देणे.
  • सर्वधर्मसहिष्णुता, सर्व भाषांप्रती सन्मान व पर्यावरणप्रेम इ. मूल्यांद्वारे आंतरराष्ट्रीय सलोख्याची बीजे तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून सर्वसमावेशक शिक्षणाची गुणवैशिष्टये जोपासणे.
  • जागतिकीकरणाच्या दृष्टीकोनातून मूल्याधिष्ठीत शिक्षणाची जोपासना करणे, दुर्बल घटकांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करून शिक्षण प्रवाह अखंडीत ठेवणे.