इयत्ता |
नर्सरी, छोटा शिशु, मोठा शिशु |
विभाग |
३ |
क्षमता |
१५९ |
शिक्षक संख्या |
२ |
शिक्षकेत्तर |
३ |
बालवाडी हा घर व शाळा यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे.
बालवाडीत मुलांच्या व्यक्तिमत्वचा विकास होतो. त्यामध्ये आकलन व निरीक्षण शक्ति वाढते, खेळामुळे त्यांचा मानसिक व शारीरिक विकास होतो.
शाळेत इतर मुलांबरोबर एकत्र सहभोजनाची, खेळण्याची सवय लागते.
मुलांना गाणी, गोष्टी, ऐकण्याची सवय लागते, त्यामुळे त्यांची श्रवण शक्ति विकसित होते.
मुलांच्या विविध सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी शाळा निरनिराळ्या क्षेत्रामधील स्पर्धा शाळेमध्ये आयोजित होतात.
सहशालेय स्पर्धा - मुलांचा बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकास होण्यासाठी नृत्यस्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेतल्या जातात.
दिवाळी वही - छोट्या व मोठ्या शिशुतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत अभ्यास देऊन प्रत्येक वर्गातून ८ विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
क्रीडा स्पर्धा - डिसेंबर २०१९ मध्ये शिशु विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक स्पर्धा घेण्यात आल्या, यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व बक्षिसे देण्यात आली.
सण व उत्सव समारंभ - संस्कृती जतनासाठी वर्षभरमध्ये येणारे सर्व सण उदा: आषाढी एकादशी दिंडी, नागपंचमी, रक्षाबंधन, दहीहंडी, सरस्वती पूजन, भोंडला, दिवाळी, त्रिपुरी पौर्णिमा, नाताळ, मकरसंक्रांत, प्रजासत्ताकदिन, शिक्षकदिन, स्वतंत्रदीन इ. उत्सव उत्साहाने साजरे करण्यात येतात. प्रत्येक सणाला सुशोभन ठेवले जाते व मुलांचा खाऊ देण्यात येतो. पालकांचा या कार्यक्रमास भरगोस पाठींबा मिळतो.
पालकांसाठी उपक्रम - पालक मेळावा, पालक स्पर्धा व तिळगूळ समारंभ असे उपक्रम आयोजित करून पालकांना शालेय उपक्रमात सहभागी करून घेतले जाते. पालक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
सहशाले उपक्रम - भारत स्काऊट गाईड संस्थेतर्फे मोठ्या शिशुसाठी ‘बनीटमटोला’ हा उपक्रम शाळेत राबविला जातो. सहजीवन पार्क रॅली सहभाग असतो. तसेच विद्यार्थ्यांच्या बानीटमटोला समुहाद्वारे स्वतंत्रदिनी गीतगायन कार्यक्रम व प्रजासत्ताक दिनी संचलन केले जाते. प्रत्येक महिन्याच्या दुसर्या बुधवारी ‘रंग दिवस’ साजरा केला जातो व त्या दिवशी त्या रंगाने सुशोभन ठेवले जाते. मुलांचे शरीर सुदृढ व निरोगी व्हावे यासाठी प्रत्येक दिवसाचे पौष्टिक आहाराविषयीचे वेळापत्रकप्रमाणे मुलांना डबा दिला जातो. शिक्षकांसाठी संस्थेतर्फे प्रशिक्षणे आयोजित केली जातात.
बक्षिस समारंभ – वर्षभरात घेण्यात येणार्या स्पर्धेसाठी प्रत्येक वर्गातील १ ते ३ क्रमांकाचे बक्षिस देण्यात आले.
दृक आणि श्राव्य यामुळे मुलांच्या आकलनात वाढ होते. म्हणून शाळा सन २०१० पासून मुलांसाठी दूरदर्शनवर विविध प्रकारच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार्या डी.व्ही.डी. मार्फत मुलांसाठी आठवड्यातून एकदा शैक्षणिक कार्यक्रम दाखवला जातो.
तसेच मुलांच्या हाताला वळण येण्यासाठी व अक्षरे आणि अंकांची पटकन ओळख व मुलांना रंगसंगती कळावी यासाठी सन २०१० पासून नविन उपक्रम कृतियुक्त वह्या मुलांकडून सोडवून व रंग भरून घेतल्या, तसेच मोठ्यावर्गाला दर महिन्याला हस्तकलेच्या वस्तू व ठसेकाम करून मुलांकडून स्वतंत्र फाइल तयार केली जाते.
इयत्ता 1ली मध्ये सेमी इंग्रजी असल्यामुळे मोठा शिशु वर्गा पासून इंग्रजी विषय पालकांच्या विनंतीवरुन सुरू केला आहे.
मुलांमध्ये समधीटपणा वाढवा, प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी बोलता यावे, इंग्रजी भाषेतून चित्रवर्णन करता यावे, शिकवलेला अभ्यासक्रम कितपत आत्मसात केला आहे व केलेल्या अभ्यासातून मुलांना आनंद मिळवा यासाठी शाळेतर्फे दरवर्षी “ इंग्लिश डे” हा शैक्षणिक प्रकल्प आयोजित केला जातो. पालक या कार्यक्रमात सहभागी होतात. संस्थेतर्फे शिशु विभागातील विद्यार्थ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाते.
महाराष्ट्र ललितकला अकादमी चित्रकला स्पर्धा
कालदर्पण भाषा-गणित वाचन स्पर्धा
मणिभवन वकृत्व स्पर्धा
एन वार्ड स्वच्छता अभियान चित्रकला स्पर्धा
© 2016 - All Rights belongs to Swami Shamanand Education Society